
Manoj Jarange Patil
जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर मराठा सेवकांची टीम उभारण्यासाठी WhatsApp क्रमांक 9421292222 जाहीर केला. इच्छुकांनी पूर्ण नाव, पत्ता, गाव, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक मेसेजद्वारे पाठवावा, फोन करू नये, असे आवाहन केले. समाजाची एकजूट, शिक्षण, आरक्षणाचा लाभ आणि निःस्वार्थ सेवा हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. नोंदणीनंतर सेवकांना नियमावली व कामाची माहिती दिली जाणार आहे. तसेच आरक्षण, प्रमाणपत्रे, शिक्षण आणि योजनांमधील अडचणींसाठी १४ नोव्हेंबरला स्वतंत्र क्रमांक जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.