Manoj Jarange Patil

Share this Video

जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. खासगी फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीविरोधात गावकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन करत शेतकऱ्यांना संकटात धीर धरण्याचा सल्ला दिला. अजित पवारांच्या विमान अपघाताची कुटुंबाच्या मागणीनुसार सखोल चौकशी व्हावी, असे ते म्हणाले. ₹५०० कोटींच्या ऑडिओ प्रकरणातील एसआयटी तपासावर प्रश्न उपस्थित करत भाजपशी संबंधित व्यक्तींना वाचवले जात असल्याचा आरोप केला. फडणवीस आणि शिंदेंवर टीका करत स्वतःविरोधात बोलण्यासाठी पैसे दिले जात असल्याची शंकाही व्यक्त केली. दिव्यांगांच्या ₹६,००० मानधनासाठी वर्षा निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा सल्ला दिला.

Related Video