Devendra Fadnavis

Share this Video

गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉयड मेटल्सच्या अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्राची माहिती दिली. या केंद्रात ४० प्रकारच्या ट्रेड्समध्ये जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जात असून आतापर्यंत ४ हजार तरुणांना प्रशिक्षणानंतर रोजगार मिळाला आहे. आणखी ५ हजार जणांचे प्रशिक्षण सुरू आहे. तसेच ग्लोबल स्किल्स अँड आंत्रप्रेन्योरशिप संस्थेचे भूमिपूजन करण्यात आले. प्रशिक्षण घेणाऱ्यांमध्ये ५५ टक्के मुलींचा सहभाग असून जगातील सर्वात मोठा ३५० टन क्षमतेचा डंपर गडचिरोलीत एक महिला चालवत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. स्थानिक आदिवासी, दलित आणि ओबीसी समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमासाठी लॉयड मेटल्स आणि बी. प्रभाकरन यांचे फडणवीस यांनी अभिनंदन केले.

Related Video