
Delimitation Bill
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध करेल आणि सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील, अशी अपेक्षा हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांनी राष्ट्रीय स्तरावरील संवाद कायम ठेवावा, असे त्यांनी सांगितले. डीएमकेने विधेयकाच्या समर्थनाचा पुनर्विचार करावा, असे आवाहनही केले. शरद पवारांच्या ज्येष्ठतेचा विचार करून काँग्रेसने त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.