
बीडमध्ये नवजात बाळाला डॉक्टरांच्या मायेचा आधार!
बीड जिल्हा रुग्णालयात एका ४० वर्षीय महिलेने अवघ्या दीड किलो वजनाच्या नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला स्वीकारण्यास नकार देत रुग्णालयातून निघून गेली. गेल्या ४१ दिवसांपासून आई बाळाकडे फिरकलेली नाही. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी त्याची काळजी घेतली. डॉक्टरांनी स्वखर्चातून उपचार सुरू ठेवत बाळासाठी दुधाचीही व्यवस्था केली. आता उपचारांमुळे बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. संबंधित महिला विधवा असून बाळाचे वडील कोण, याची प्रशासनाला माहिती नाही. आईविरोधात तक्रारही दाखल झालेली नाही. या चिमुकल्याच्या भवितव्याचा प्रश्न मात्र कायम आहे. याबाबत डॉ. मोहिनी जाधव यांनी माहिती दिली.