NCP Merger

Share this Video

पुण्यात छगन भुजबळ यांनी भिडेवाडा आणि फुलेवाड्याच्या कामांची पाहणी केली. सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडेवाड्यात स्मारक उभारण्यासाठी २० ते २२ वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून पुनर्निर्माण सुरू असून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा इतिहास येथे मांडला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामाचे भूमिपूजन केल्याचेही भुजबळ म्हणाले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त देशभर दोन वर्षे विविध कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा मोदींनी केल्याचे त्यांनी सांगितले. फुलेवाड्यात अधिक पर्यटकांना भेट देता यावी यासाठी परिसरातील जागा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही नमूद केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर 'फक्त चर्चा सुरू आहे', असे भुजबळ म्हणाले. पक्षाच्या बैठका घेण्यात गैर काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या आरोपांवर राहुल गांधी आणि सरकारच उत्तर देतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Video