
Shaina NC
शायना एनसी यांनी माफी मागितल्यानंतरही ठाकरे गटाकडून सुरू असलेल्या आंदोलनावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. फोटो अनावधानाने फाडला गेला असून एका महिलेची चूक माफ करावी, असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंचा अवमान होऊ नये, मात्र प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सोनिया गांधींच्या पुस्तकातील सावरकरांबाबतच्या मजकुरावरून काँग्रेसवर टीका करत उद्धव ठाकरे गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गांधी परिवाराच्या फायद्यासाठी आणि राहुल गांधींची प्रतिमा उंचावण्यासाठी पुस्तकातील मजकूर लिहिल्याचा आरोपही त्यांनी केला.