Chandrashekhar Bawankule

Share this Video

नागपुरात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोनिया गांधी यांच्या 'जर्नी ऑफ लव्ह' पुस्तकावर टीका केली. २०२९ च्या निवडणुकीत मतदारांना संभ्रमात टाकून मते मिळवण्यासाठी हे पुस्तक आणल्याचा आरोप त्यांनी केला. आणीबाणी, बाबरी मशीद आणि मुस्लिम मतदारांच्या मुद्द्यांवरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसकडे विकासाचा आराखडा नसून २०२९ मध्ये पक्षाची स्थिती आणखी खराब होईल, असा दावा त्यांनी केला. विकसित भारताच्या मुद्द्यावर जनता नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभी राहील, असेही ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

Related Video