
AI Farming
बारामतीत एआय तंत्रज्ञानामुळे एकरी ऊस उत्पादन १२० ते १२५ टनांपर्यंत वाढल्याची माहिती युगेंद्र पवार यांनी दिली. पाणी आणि खतांचा वापर कमी झाल्याने एकरी २५ ते ३० हजार रुपयांची बचत होत असून, गरजू शेतकऱ्यांसाठी केव्हीके आणि व्हीएसआयमार्फत अनुदानाची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि साखर कारखान्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवार निवृत्त होतील असे वाटत नसून, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे ते म्हणाले. रोहित पवारांच्या आंदोलनाबाबत प्रदेशाध्यक्षांना विचारण्यास त्यांनी सांगितले, तर नागपुरातील गुप्त बैठकीची माहिती नसल्याचे स्पष्ट केले.