Abu Asim Azmi

Share this Video

मुंबईत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचे समर्थन करत त्यांनी स्वतःचे अनुभव मांडल्याचे सांगितले. १९९२ नंतर काँग्रेस कमकुवत झाल्याचेही ते म्हणाले. UCC संदर्भात धार्मिक स्वातंत्र्य आणि मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. अखिलेश यादव यांच्या राम मंदिर भेटीवरून ओवैसींनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडणे चुकीचे असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष ३०० हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधींवरील विदेशी निधीचे आरोप फेटाळले. दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आनंद होईल, असेही ते म्हणाले. तसेच राम मंदिरात न जाणे हा कीर्ती आझाद यांचा निर्णय असला तरी इतरांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Video