Rohit Pawar

Share this Video

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवरून सरकारवर टीका केली. कर्जमाफीचा लाभ अद्याप ८० टक्के लोकांना मिळालेला नाही, तर दिवाळीसाठी जाहीर केलेले ५ हजार रुपये ६० टक्के लोकांपर्यंत पोहोचले नसल्याचा दावा त्यांनी केला. हेक्टरी मदत जाहीर न होणे, जनावरांसाठी चारा न मिळणे आणि मायक्रोफायनान्सच्या समस्येवर कारवाई न होण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच गोकुळ दूध संघात काँग्रेस विचारांच्या पॅनेलला बहुमत मिळाल्यानंतर सरकारने चार अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्याचा आरोप त्यांनी केला. हा निर्णय संविधानविरोधी असल्याचे सांगत अधिकाऱ्यांचे अधिकार मागे न घेतल्यास कोल्हापुरातील आंदोलन राज्यभर पसरेल, असा इशारा दिला. सरकारचे लक्ष शेतकऱ्यांऐवजी सत्ता टिकवणे आणि पक्ष फोडण्यावर असल्याची टीकाही त्यांनी केली.

Related Video