
Thane Firing
ठाणे फायरिंग प्रकरणावर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अनेक आरोप केले. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संशयित म्हणून माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची नावे सुरुवातीच्या FIRमध्ये नव्हती, असा दावा राऊत यांनी केला. आदित्य ठाकरे आणि शिवसेना (UBT) नेत्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन चर्चा केल्यानंतर पुरवणी FIR नोंदवण्यात आली आणि प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांचा पुन्हा जबाब घेऊन दोघांची नावे त्यात समाविष्ट करण्यात आली, असा दावा राऊत यांनी केला. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना ताब्यात घेऊन चौकशी आणि कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच मुख्य आरोपींवर कारवाई होईपर्यंत शिवसेना (UBT) कार्यकर्त्यांचा लढा सुरू राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.