
उद्धव ठाकरेंचे सरकार बदलण्याचे आवाहन, वांगचुकांना पाठिंबा
शिवाजी पार्क येथे सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. NEET पेपरफुट प्रकरण, विद्यार्थ्यांचे प्रश्न, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत त्यांनी देशभर आंदोलन उभारण्याचे आवाहन केले. तसेच रोजगार, शिक्षण, लोकशाही, संविधान आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरही त्यांनी भूमिका मांडली.