
Suresh Dhas
-सध्या आष्टी मतदार संघात दुष्काळ जाहिर झाला आहे, त्याच बरोबर फळबाग धारक 15 हजार पेक्षा जास्त शेतकरी आष्टी मतदार संघात असल्याने.. फळबाग जगण्यासाठी सरकारने तात्काळ मदत करावी ही मदत कशा पध्दतीने जास्ती जास्त शेतकऱ्यांना देता यासाठी आष्टी येथे आमदार सुरेश धस यांनी फळबाग धारक शेतकऱ्यांशी संवाद बैठक आयोजित करण्यात आली यावेळी आमदार सुरेश धस यांनी जळपास 200 शेतकरी विमानाने दिल्लीला घेउन जाऊन केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा कृषिमंत्री शिवराजशिंग यांची भेट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे..... यावेळी आमदार सुरेश धस यांनी सांगितले की मी जबाबदारीने बोलतोय शेतकऱ्यांचा जाणता राजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनीच दोनदा कर्ज माफी केली,आता ही केली आहे...