
Sunil Tatkare
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या एकनाथ शिंदेंवरील ₹500 कोटींच्या आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली. संबंधित ऑडिओ क्लिप पाहिली नसल्याचे सांगत जरांगेंना संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावर रोहित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देत अमित शाह यांची भेट घेण्यात गैर नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीला अर्थ खाते मिळावे ही पक्षाची भूमिका कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, असे ते म्हणाले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार अधिकाधिक मदत करेल, असा विश्वास व्यक्त करत रायगडमधील पक्षप्रवेश आणि संघटनवाढीबाबतही त्यांनी माहिती दिली.