
Sunetra Pawar
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने मुंबईच्या स्पिरीटचे कौतुक केले. कितीही हल्ले झाले किंवा कोणतीही घटना घडली तरी मुंबई थांबत नाही, झुकत नाही आणि हार मानत नाही; मुंबई नेहमीच धावत राहते, असे त्या म्हणाल्या.टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक धावपटूचे स्वप्न असते आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या उद्देशाने धावतो. दिव्यांग स्पर्धकांचाही त्यांनी उल्लेख केला. कोविडनंतर फिटनेसचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून प्रत्येकाने आरोग्य आणि फिटनेसकडे लक्ष द्यावे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. पुढील टाटा मुंबई मॅरेथॉन 17 जानेवारी 2027 रोजी होणार असून त्यासाठी तयारी सुरू झाली आहे.