Maharashtra Drought Compensation

Share this Video

छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारवर टीका केली. बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांना धमक्या मिळत असतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत त्यांनी हेक्टरी ₹१ लाख मदतीच्या मागणीला पाठिंबा दिला. सरकारच्या ₹५ हजार मदतीसोबत नमो शेतकरी योजनेचे थकीत ₹४ हजारही तातडीने द्यावेत आणि शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी सुळे यांनी केली.

Related Video