
लाडकी बहीण योजनेत 69 लाख अपात्र? किरीट सोमय्यांचा मोठा आरोप
मुंबईत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठा आरोप करत 69 लाख अपात्र महिलांची नावे योजनेत समाविष्ट झाल्याचा दावा केला.घुसखोर, बनावट लाभार्थी आणि पडताळणीत समोर आलेल्या गैरप्रकारांवर चौकशीची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच बंगाल, बांगलादेशी घुसखोर आणि निवडणूक प्रक्रियेवरही सोमय्यांनी निशाणा साधला.