Eknath Shinde यांचा झाडांचे ऑडिट, हलगर्जी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Share this Video

उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर झाडांचे वैज्ञानिक पद्धतीने ऑडिट करण्याचे निर्देश दिले. झाडे, फांद्या कोसळणे, पाणी साचणे यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात ठेवावी, असे त्यांनी सांगितले. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. जखमींवर महापालिकेच्या माध्यमातून उपचार करण्याच्या सूचना देतानाच 'Zero Casualty' हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच वारकऱ्यांनी सुरक्षित वारी करावी, असे आवाहन करत आळंदी परिसरातील सुविधांसाठी तातडीने निधी मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली.

Related Video