Eknath Shinde London Visit

Share this Video

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडन दौऱ्यात मिळालेल्या पुरस्कारांबाबत बोलताना हा आपला वैयक्तिक सन्मान नसून महाराष्ट्रातील जनतेचा सन्मान असल्याचे सांगितले. लंडनमधील विविध व्यासपीठांवर महाराष्ट्राच्या विकासाचे ब्रँडिंग आणि शोकेसिंग करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही शिंदे म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असून भारत पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले. लंडनमधील रस्ते, पायाभूत सुविधा, हेरिटेज इमारती आणि वाहतुकीची शिस्त यांचाही त्यांनी उल्लेख केला.लंडनमध्ये विराट कोहली यांच्याशी झालेल्या सदिच्छा भेटीबद्दलही शिंदे यांनी माहिती दिली. दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. विराट कोहली यांनी अनेक विक्रम केले असूनही त्यांचा ‘डाउन टू अर्थ’ स्वभाव पाहायला मिळाल्याचे शिंदे म्हणाले. तसेच लंडनमध्येही मराठी संस्कृतीचा अनुभव घेतल्याचे आणि वडापाव खाण्याचा आनंद घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Related Video