
एकनाथ शिंदे : विकसित भारत 2047चा संकल्प
कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारगिल युद्धातील शूर जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अभिवादन केले. 'मेक इन इंडिया' अंतर्गत संरक्षण क्षेत्रातील प्रगती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत 2047चा संकल्प, तसेच ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या संरक्षण क्षमतेवर त्यांनी भाष्य केले. कारगिलमधील शौर्य, सैनिकांचे बलिदान आणि राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.