श्रीकांत शिंदेंनी NEET कारवाईवर मोदींची भूमिका सांगितली

Share this Video

संसद अधिवेशनादरम्यान झालेल्या बैठकीनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाची माहिती दिली. देशातील युवक नवकल्पना, स्टार्टअप आणि संशोधन क्षेत्रात मोठे योगदान देत असून महाराष्ट्र स्टार्टअप क्षेत्रात आघाडीवर असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तरुणांनी विकसित केलेल्या स्वदेशी रॉकेटचाही त्यांनी उल्लेख केला.NEET पेपर लीक प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.यावेळी विरोधकांकडून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसदेचे कामकाज वारंवार ठप्प केले जात असल्याची टीकाही करण्यात आली. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तरुणांचे सर्वात मोठे विरोधक म्हटल्याच्या वक्तव्यालाही त्यांनी उत्तर दिले.

Related Video