
एकनाथ शिंदे: बुलढाण्यात शेतकऱ्यांना मदत देणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पाहणी केलेल्या भागांमध्ये कापूस, सोयाबीन आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. केंद्र सरकारकडेही मदत मागितली जाणार असून यापूर्वीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत केल्याचे ते म्हणाले. केंद्राची मदत येईपर्यंत राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देण्यात मागे हटणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.