एकनाथ शिंदे: विरोधक युवकांच्या मुद्द्याचं राजकारण करतायत

Share this Video

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये शिवसेनेच्या नव्या खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत माहिती दिली. या भेटीत मतदारसंघातील विकासकामे आणि विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.देशाच्या भविष्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगताना शिंदे यांनी RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या लोकशाही आणि आंदोलनाबाबतच्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांशी संवाद साधत असल्याचेही त्यांनी नमूद केले.युवकांच्या प्रश्नांवरून विरोधकांकडून सरकारवर आरोप केले जात असल्याचा दावा शिंदे यांनी केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि संसदेत या मुद्द्यांवर चर्चा करण्यास विरोधक तयार नसल्याचा आरोप करत, युवकांच्या प्रश्नांचे राजकारण केले जात असल्याची टीका त्यांनी केली.

Related Video