
MPSCवर राहुल गांधींना आशिष शेलारांचा टोला
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी डीजेसंदर्भात कायदा आणि शासन निर्णयानुसार कारवाई सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांची सहमती आणि सहभाग आवश्यक असून पोलीस व मंडळांना सोबत घेऊन सामोपचाराने कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे ते म्हणाले.MPSC पेपर लीक आणि विश्वासार्हतेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर शेलारांनी त्यांना झारखंड आणि कर्नाटक सरकारलाही हाच प्रश्न विचारणार का, असा प्रतिप्रश्न केला. विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता असेल तर कर्नाटक आणि झारखंडमधील प्रकरणांवर भूमिका स्पष्ट करावी, असे शेलार म्हणाले. विद्यार्थ्यांची चिंता रास्त असून मोदी सरकार कायदा, निर्णय आणि कठोर कारवाई करत असल्याचेही त्यांनी सांगितले.