शरद पवार: कर्जवसुली स्थगित नको, कर्जमाफी द्या

Share this Video

शरद पवार यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना सरकारच्या उपाययोजनांमध्ये आणखी सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले. कर्जवसुलीला केवळ स्थगिती दिल्यास कर्ज शेतकऱ्यांच्या डोक्यावर कायम राहील आणि थकबाकीदार झाल्याने नवीन कर्ज मिळण्यात अडचण येईल, असे त्यांनी म्हटले. 265 तालुक्यांबरोबर उर्वरित भागातील परिस्थितीचाही विचार करण्याची गरज त्यांनी मांडली. शेतकरी आणि शेतमजुरांना आधार देण्यासाठी सरकारकडे मागण्या मांडणार असून प्रश्न सुटला नाही तर संघर्षाचा मार्ग स्वीकारू, असेही शरद पवार यांनी सांगितले.

Related Video