
शायना एनसी म्हणाल्या, राज ठाकरेंनी पुरावे द्यावेत
भाजप नेत्या शायना एनसी यांनी राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. सिद्धिविनायक ट्रस्टचे लेखापरीक्षण आणि आर्थिक नोंदी सार्वजनिक असल्याचे सांगत आरोपांचे पुरावे सादर करण्याचे आव्हान त्यांनी दिले. धर्माच्या आधारावर राजकारण करू नये, असेही त्या म्हणाल्या. तसेच सनातन धर्मावरील वाद, आंदोलनातील हिंसाचार, अमली पदार्थांविरोधातील मोहिम, देशविघातक कारवाया आणि युवकांना लक्ष्य करणाऱ्या ड्रग नेटवर्कविरोधात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.