Hardeep Puri

Share this Video

जेफ्री एप्स्टीन प्रकरणावरून संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. एप्स्टीनशी कधीही भेट झाली नसल्याच्या पुरी यांच्या कथित दाव्याला अमेरिकेतून समोर आलेल्या माहितीने छेद दिल्याचा दावा राऊतांनी केला. या प्रकरणातील आणखी गोपनीय फोटो आणि फाईल्स समोर येतील, असेही ते म्हणाले. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या मुंबई भेटीचाही त्यांनी उल्लेख केला. आगामी सत्ताबदलात एप्स्टीन प्रकरणाची मोठी भूमिका असेल, असा दावा करत मोदी आणि अमित शाह सरकार चालवण्यात हतबल झाल्याची टीका त्यांनी केली. सरकार बदलण्याची प्रक्रिया अचानक वेग घेईल, असे भाकीतही राऊतांनी केले.

Related Video