
संजय राऊतांचा राम मंदिर निधीवर गंभीर सवाल
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना टॉलस्टॉय यांच्या कथेद्वारे सत्तेचा हव्यास आणि महत्त्वाकांक्षेवर भाष्य केले. त्यांनी अमित शाह, नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत राजकीय घडामोडींवर टीका केली. तसेच आमदारांना ऑफर दिल्याचे दावेही त्यांनी केले. राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक आणि व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत शिवसेनेकडून ‘रामरक्षा आंदोलन’ सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादरमध्ये आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
