
Sanjay Raut यांचा संताप, महिला अत्याचार प्रकरणांवर SIT वर सवाल
मुंबईत Sanjay Raut यांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचार प्रकरणांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. चार वर्षांच्या मुलीवरील गंभीर घटनेवर बोलताना त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.आरोपी पोलिस कस्टडीत असताना SIT नेमण्याची गरज काय, असा सवाल करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.चाकण, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधील घटनांचा उल्लेख करत, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.