
संजय राऊत : राम मंदिर चोरीवर उत्तर द्या
संजय राऊत यांनी शिंदे सेनेच्या खासदारांच्या अमित शाह यांच्या भेटीवर टीका करत गंभीर आरोप केले. रामरक्षा पठणाच्या मुद्द्यावर बोलताना, राम मंदिरातील कथित चोरी आणि दानपेटी प्रकरणावर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या नियोजित राम मंदिर भेटीबाबतही त्यांनी माहिती देत, १८ तारखेला मंदिरात रामरक्षा पठण आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित केले जाईल, असे सांगितले. जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री भेटीमागे त्यांच्या मतदारसंघातील नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा मुद्दा असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच सरकारने विधेयकात दुरुस्ती करून आणल्यास विरोधक चर्चा करतील, असेही राऊत म्हणाले.