Sanjay Raut

Share this Video

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे, अमित शहा आणि निवडणूक आयोगावर आरोप केले. धनुष्यबाणाची चोरी झाल्याचा दावा करत त्यांनी आधी ‘मुद्देमाल जप्त करा’, अशी मागणी केली.राऊत यांनी राष्ट्रपतींना प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक पाठवल्याबाबतही भूमिका मांडली. धीरेंद्र शास्त्री यांच्या राष्ट्रपती भवनातील भेटीचा उल्लेख करत हे पुस्तक नरेंद्र मोदींनाही पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकाचे इंग्रजी आणि हिंदी भाषांतर करण्याचे काम सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली.नारायण राणे यांच्यासोबतच्या मानहानी प्रकरणात तडजोडीबाबत राऊत यांनी सांगितले की, राणे यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर तडजोडीचा प्रस्ताव मांडला आहे; मात्र आपल्याकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. अंगणवाडीतील निकृष्ट पोषण आहाराच्या मुद्द्यावरही प्रकरण आपल्यासमोर आल्याचे सांगत उद्यापर्यंत त्याचा निकाल लावणार असल्याचे राऊत म्हणाले.

Related Video