
संजय राऊत: भारताने नेपाळला पुन्हा उभं करावं
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी नेपाळला भारताकडून करण्यात येणाऱ्या मदतीचे कौतुक केले. भारत आणि नेपाळचे भावनिक संबंध असल्याचे सांगत नेपाळला मदत करून पुन्हा उभे करणे हे मोठा भाऊ म्हणून भारताचे कर्तव्य असल्याचे राऊत म्हणाले. नेपाळी नागरिक भारतात काम करतात, गोरखा रेजिमेंट तसेच धार्मिक आणि पर्यटनाच्या माध्यमातूनही दोन्ही देशांचे संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले.याच मुलाखतीत राऊत यांनी मोहन भागवत यांच्या परदेशातील विधानावर भाष्य करत अशी विधाने भारतातही केली पाहिजेत, असे म्हटले. राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांबाबत संघाने भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर बोलताना असे विलिनीकरण होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. शरद पवार यांचे राजकीय स्थान अधोरेखित करत जयंत पाटील यांच्या निष्ठा, श्रद्धा आणि स्थैर्याबाबतच्या भाषणाचाही त्यांनी उल्लेख केला.