
उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा
मंत्री उदय सामंत यांनी पक्षाच्या भूमिकेसंदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर भाष्य करताना, नियमानुसार असलेली सर्व कागदपत्रे वकील न्यायालयासमोर मांडतील आणि योग्य निर्णय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिल्या जात असलेल्या माहितीची आपल्याला कल्पना नसल्याचेही त्यांनी सांगितले.देशाच्या GDP वाढीवर बोलताना सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. विरोधकांच्या टीकेमुळे काम करण्याची ऊर्जा वाढते, असे सांगत GDP वाढीचे श्रेय केंद्र सरकार आणि देशातील जनतेला दिले.‘Operation Tiger’बाबत सामंत यांनी हे ऑपरेशन सांगून होत नसल्याचे म्हटले आणि ते यशस्वी झाल्यानंतर मोठी ब्रेकिंग न्यूज मिळेल, असा दावा केला. ग्रामपंचायत सदस्यांपासून मोठ्या लोकप्रतिनिधींपर्यंत अनेक जण एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.संजय राऊत यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाच्या टीकेला उत्तर देताना सामंत यांनी वरळी मतदारसंघातील प्रश्नांचा उल्लेख करत टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या मतदारसंघात आणि पक्षात काय सुरू आहे ते पाहावे, असे म्हटले. तसेच नागरिकांना जास्तीत जास्त नैसर्गिक पाणी मिळावे आणि पाणीटंचाईचा फायदा घेणाऱ्या टँकर माफियांवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.