
रोहित पवारांची ₹1 कोटी भरपाईची मागणी
पिंपरी-चिंचवडमधील मुरसी येथील दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी नुकसानभरपाई आणि कंपनीविरोधातील कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले. कंपनीकडून सुरुवातीला 25 लाख रुपयांची भरपाई देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती, तर 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. सध्या प्रत्येक कुटुंबाला 40 लाख रुपये मिळत असून, काही कुटुंबांवर ही रक्कम स्वीकारण्यासाठी कंपनीकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे.मृतांच्या कुटुंबीयांना शिक्षणासाठी मदत आणि घर देण्याचे आश्वासन पूर्ण करण्याचीही मागणी आहे. कंपनीच्या संचालकाविरोधात कारवाई न झाल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यावर कारवाई झाली असली तरी कंपनीच्या मालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी आहे.चाकण MIDC परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि इतर समस्यांमुळे नागरिकांमध्ये वाढत असलेल्या नाराजीचाही रोहित पवार यांनी उल्लेख केला. तसेच नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील VIP तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला.