
इंधन दरवाढीवर रोहित पवारांचा हल्लाबोल
Rohit Pawar यांनी इंधन दरवाढ, केंद्र सरकारची परराष्ट्र नीती आणि खर्च कपातीच्या आवाहनावर जोरदार टीका केली आहे.इराणसोबतचे संबंध योग्य पद्धतीने हाताळले असते तर भारताला स्वस्त तेल मिळालं असतं, असं रोहित पवार म्हणाले.तसंच, आधी सरकारने तेलावर मोठा नफा कमावला आणि आता दरवाढीचा भार सामान्य जनतेवर टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.पंतप्रधान Narendra Modi यांच्या खर्च कमी करण्याच्या आवाहनावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.“सरकारने आधी मोठे प्रकल्प आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण आणावं,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
