
Rohit Pawar
रोहित पवार यांनी CETशी संबंधित सुमारे 4.90 लाख विद्यार्थ्यांची खासगी माहिती बाहेर आल्याचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित विद्यार्थिनीची तक्रार असूनही FIR नोंदवली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय Crime Branchकडे पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितल्याचा दावा करत, दखलपात्र गुन्हा असतानाही FIR नाकारल्यामुळे पोलीस विभागावर वरिष्ठांचा दबाव असल्याचा आरोप पवारांनी केला.रोहित पवार यांनी EduSpark कंपनीला सुमारे ₹850 कोटींचे कंत्राट दिल्याचा दावा केला. तसेच दोन हजार विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ₹20 लाख घेतल्याचा आणि त्यातून सुमारे ₹400 कोटींचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. डेटा लीक आणि कंत्राट मिळून CETमध्ये सुमारे ₹1,200 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला. पुरावे देऊनही EduSparkला पाठिंबा मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.प्रवेशासाठी 15 सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याचे सांगत, पैसे दिलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये प्राधान्य मिळत असेल तर इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा पवारांनी उपस्थित केला. पुढील सात दिवसांत पुराव्यांची शहानिशा करण्याचे सांगण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर पुन्हा CETकडे जाऊन प्रवेश प्रक्रिया थांबवण्याबाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.