रोहित पवारांचा आरोप: डिलिमिटेशन, परराष्ट्र धोरण आणि भ्रष्टाचारावर सरकारवर निशाणा

Share this Video

Rohit Pawar यांनी पत्रकार परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. अजित दादांच्या अपघात प्रकरणात तपासात ढिलाई होत असल्याचा दावा करत त्यांनी संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले.डिलिमिटेशन विधेयकावर बोलताना त्यांनी भाजपवर राजकीय फायद्यासाठी मतदारसंघांच्या सीमा बदलल्याचा आरोप केला. महिला आरक्षण विधेयकाला समर्थन असल्याचे स्पष्ट करत त्यांनी डिलिमिटेशनच्या नावाखाली अजेंडा राबवला जात असल्याचे सांगितले.तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका करत शेजारी देशांसोबतचे संबंध बिघडल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. महागाई, व्यवसायांवरील परिणाम आणि सामान्य नागरिकांवर वाढलेला आर्थिक भार यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video