Rohit Pawar

Share this Video

रोहित पवार यांनी FDA ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा मुद्दा उपस्थित करत MPSCच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. गेल्या महिन्यापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून पोलीस अधिकारी, तपास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुरावे दिल्याचे त्यांनी सांगितले. MPSCने FDA ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर फुटल्याचे मान्य केल्याचा दावा करत त्यांनी MPSCचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणाची योग्य चौकशी करून जबाबदार व्यक्तींची माहिती समोर आणावी, अशीही मागणी त्यांनी केली.पेपरफुटी रोखण्यासाठी अधिक कठोर कायद्याची गरज असल्याचे सांगत पवार यांनी यासंदर्भात खासगी विधेयक मांडल्याचे नमूद केले. हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा व्हावी आणि पेपरफुटीविरोधात कठोर नियम आणले जावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या मुद्द्यावरही रोहित पवार यांनी विरोध दर्शवला. ही संकल्पना देशाच्या संघराज्य व्यवस्थेविरोधात असल्याचे सांगत त्यांनी या विधेयकाला समर्थन देऊ नये, असे आवाहन केले. तसेच या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवरही टीका केली.

Related Video