
Ritu Tawde यांचे दुहेरी विधान
मुंबईत पहिल्यांदाच सिग्नलवरच्या मुलांसाठी Signal School सुरू करण्यात आली असून या उपक्रमाचे उद्घाटन Ritu Tawde यांच्या हस्ते करण्यात आले. या शाळेमुळे रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना शिक्षण आणि कौशल्य विकासाची संधी मिळणार आहे.याचवेळी त्यांनी LPG गॅस तुटवड्यावरही महत्त्वाचं वक्तव्य केलं. घरगुती गॅस पुरवठा सुधारत असल्याचा दावा करत, कमर्शियल गॅसची परिस्थितीही लवकरच सुरळीत होईल असं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
