
रामदास आठवलेंचं विरोधकांना प्रत्युत्तर
लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांचा प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026 सादर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचे सांगतानाच ते शांततेत आणि शिस्तीत व्हावे, असे त्यांनी म्हटले. लाठीमाराच्या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगत, शांततापूर्ण आंदोलनातूनच मागण्या मान्य होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी व्यक्त केलेल्या शिस्तीच्या भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.