रामदास आठवले यांची मोठी प्रतिक्रिया! पेट्रोल दर कपात, युद्ध आणि ममता बॅनर्जीवर टीका

Share this Video

Ramdas Athawale यांनी पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटी कपात, आंतरराष्ट्रीय युद्धस्थिती आणि पश्चिम बंगालच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेल दरात घट झाली असून, यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका-इराण तणाव आणि युद्धस्थितीबाबत बोलताना, युद्ध थांबवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पाकिस्तान मध्यस्थी करू शकत नाही, भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.पश्चिम बंगालच्या राजकारणावर बोलताना Mamata Banerjee यांच्यावर त्यांनी टीका केली. रामनवमी कार्यक्रम, बंगालमधील कायदा-सुव्यवस्था आणि निवडणुकांबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

Related Video