
Raksha Khadse: दुष्काळात केंद्राकडून अधिक मदत मिळवणार
रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधी आणि त्यांच्या आघाडीने निवडणूक आयोगावर केलेले मतचोरी व निवडणुकीतील गैरप्रकारांचे आरोप फेटाळले. निवडणूक आयोग स्वतंत्र असून निवडणुका निष्पक्ष झाल्याचा दावा त्यांनी केला. मतदार नोंदणी, नाव वगळणे आणि दुरुस्तीसाठी फॉर्म 6, 7 आणि 8 ची प्रक्रिया स्थानिक पातळीवर राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान बदलण्याच्या आरोपांवरही त्यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. तसेच महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत देण्याची घोषणा केली असून केंद्राकडूनही जास्तीत जास्त मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे रक्षा खडसे म्हणाल्या.