Farmers Protest l बीडमध्ये राजेंद्र मस्केंचा दुष्काळासाठी रास्ता रोको

Share this Video

बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बीड-अहिल्यानगर महामार्गावरील चराटा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी आणि पशुपालक अडचणीत असताना सरकारकडून केवळ मदतीच्या घोषणा होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शेतकरी बैलगाड्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तासाभरापासून रोखण्यात आली. सरकारने तात्काळ मदतीची अंमलबजावणी करावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिला.

Related Video