raj thackeray

Share this Video

राज ठाकरे यांनी ECI विरोधातील मोर्चात निवडणूक प्रक्रिया, मतदार याद्या आणि SIR वरून निवडणूक आयोगावर आरोप केले. 2017-18 पासून निवडणूक प्रक्रियेतील घोळाबाबत आपण बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान महाराष्ट्रात 40 ते 60 लाख मतदार वाढल्याचा दावा करत त्यांनी या वाढीवर प्रश्न उपस्थित केला. देशातील मतदारांनी कोणाला सत्तेत आणि कोणाला विरोधी पक्षात बसवायचे हे ठरवले पाहिजे, निवडणूक आयोगाने नाही, असे राज ठाकरे म्हणाले. मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार वाढवून सत्ता मिळवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेला SIR पूर्णपणे रद्द करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंग यांच्या SIR संदर्भातील भूमिकेचा उल्लेख करत देशभर किंवा राज्यभर सरसकट SIR राबवणे बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला. SIR मधून दोन कोटी लोकांना बाहेर काढल्याचा दावाही त्यांनी केला. यापुढील निवडणुका मतदान यंत्राऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

Related Video