Kishan Jawale यांचा रायगडसाठी रेड अलर्ट इशारा

Share this Video

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी परिस्थितीबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात असून अनेक भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरडप्रवण 392 गावांमध्ये पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तर 225 गावांमध्ये ऑडिओ अलर्ट यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. पूर आणि दरड कोसळण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शाळांबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

Related Video