Prithviraj Chavan

Share this Video

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा काँग्रेसने संसदेत उपस्थित केल्याचे सांगत, विरोधक म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न रस्त्यावर मांडणे हे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी कोटा, उत्तराखंडसह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचा उल्लेखही त्यांनी केला.नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनावर चव्हाण यांनी सरकारकडे Detailed Project Report सार्वजनिक करण्याची मागणी केली. नाशिकच्या जनतेशी चर्चा करून त्यांच्या गरजा आणि प्राधान्यक्रम जाणून घेतले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोट्यवधी भाविक येणार असल्यास त्याचा गोदावरी नदीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन Environmental Impact Assessment आणि Social Impact Assessment करण्यात आले आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली.कुंभमेळ्यासाठीच्या सुमारे ₹35 हजार कोटींच्या बजेटसह नाशिक रिंग रोड आणि शक्तिपीठसारख्या मोठ्या प्रकल्पांवरून त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. हे प्रकल्प टेंडर काढून 40 टक्के कमिशन मिळवण्यासाठी राबवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही चव्हाण यांनी केली. तसेच एका घटनेनंतर करण्यात आलेल्या कथित ‘शुद्धीकरणा’चा त्यांनी निषेध केला. वंदे मातरम आणि स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख करत त्यांनी भाजप आणि RSS वरही टीका केली. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून देशाला एकत्र आणण्याऐवजी विभाजन केले जात असल्याचा आरोप त्यांनी पंतप्रधानांवर केला.

Related Video