Pradip Purnekar

Share this Video

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांना अटक करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. पूर्णेकर यांच्या मुलाने ठोस पुरावे दिल्याचा दावा करत ठाणे पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयटीच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत पोलीस आयुक्तांसह ठाणे पोलीस दल बरखास्त करण्याची मागणी केली. न्याय मागण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या बंगल्याकडे जाणाऱ्या पूर्णेकर यांच्या मुलाला पोलिसांनी अडवल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच आदित्य ठाकरे, अनिल परब आणि शिवसैनिकांसह ठाण्यात जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Related Video