Explained : रशिया- युक्रेन युद्धादरम्यान वाचा भारताच्या कूटनितीचे महत्व

| Published : Aug 30 2024, 09:35 AM IST / Updated: Aug 30 2024, 10:13 AM IST

pm modi ukraine visit
Explained : रशिया- युक्रेन युद्धादरम्यान वाचा भारताच्या कूटनितीचे महत्व
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. अशातच भारताकडून सातत्याने दोन्ही देशांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांची देखील भेट घेतली होती.

India diplomatic tightrope : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) दौऱ्याची जागतिक स्तरावर मोठी चर्चा केली गेली. या दोन्ही देशांमध्ये सुरू असणाऱ्या युद्धामध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला फार महत्वाचे मानले गेले. दौऱ्यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (President Volodymyr Zelenskyy) यांची भेट घेतली. या घटनेमुळे जागतिक स्तरावर भारताने स्वत:ला हुकूमाच्या एक्क्याच्या रुपात दाखवून दिले आहे.

दरम्यान, एका बाजूला बहुतांश आंतरराष्ट्रीय नेत्यांकडून युक्रेनला पाठिंबा दिला जातोय. तर दुसऱ्या बाजूला रशियाच्या आक्रमकतेवर टिका करत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दोन्ही पक्षांसोबत कूटनितीचा वापर करत आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताच्या अशा पावलामुळे ऐतिसाहिक संबंध, रणनितींचे हित आणि शांती आणण्याचे महत्व ठळक होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कूटनितीचे महत्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन आणि झेलेन्स्की यांची भेट एका महत्वपूर्ण परिस्थितीवेळी झाली. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या स्थितीत जागतिक समुदायांचे मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले आहे. संयुक्त राज्य अमेरिकेच्या नेतृत्वात पश्चिमी देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादत युक्रेनला समर्थन दिले आहे. याउलट भारताचा दृष्टीकोन फार वेगळा आहे. भारताकडून दोन्ही देशांसाठी तटस्थची भूमिका घेतली जात आहे.

पुतिन आणि झेलेन्सकी यांना भेटेणे भारताची कूटनिती नव्हे तर मध्यस्थीची भूमिका देखील दाखवून देते. दोन्ही देशाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत बैठका घेणे, संवाद साधणे आणि शांततेला प्रोत्साहन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दीर्घकाळापासून सुरू आहे.

रशिया आणि संयुक्त राज्य अमेरिकेसोबत समतोल
भारताचे रशियासोबतचे फार जुने संबंध आहेत. शीत युद्धावेळी सोवित संघनाने भारताला पाठिंबा दिला होता. आजही रशियाकडून भारताला सैन्यासाठी लागणारी उपकरणे आणि तंत्रज्ञानाची मदत केली जाते. याशिवाय भारताने संयुक्त राज्य अमेरिकेसोबतही उत्तम नातेसंबंध जपले आहे. खासकरुन व्यापार, तंत्रज्ञान आणि संरणक्ष क्षेत्रात भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध मजबूत आहेत.

दरम्यान, युक्रेन युद्धावर रशिया आणि अमेरिकेची विरोधाची भूमिका असली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रशिया-युक्रेन या दोन्ही देशांसोबत संबंध जपण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जात आहे. यामधून भारताची कूटनिती कशाप्रकारची आहे हे स्पष्टपणे दिसून येतेय. एका बाजूला रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताने अमेरिकेसोबत आपले संरक्षण क्षेत्र आणि आर्थिक संबंध जपले आहेत.

YouTube video player

युरेशिया आणि यूरोपात भू-राजकीय प्रभाव
रशिया आणि युक्रेन देशांसोबत भारताच्या संबंधांचा युरेशिया आणि यूरोपातील क्षेत्रांवर महत्वपूर्ण प्रभाव पडतो. युरेशियात रशियाची फार महत्वाची भूमिका आहे. पण भारताने येथेही तटस्थची भूमिका घेतली आहे. कारण युरेशियातील धोरणात्मक महत्त्व आणि प्रमुख जागतिक स्तरावर सुरु असलेल्या शक्ती संघर्षामध्ये तटस्थची भूमिका फार महत्वाची आहे. युरोपात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युक्रेनचा असणारे समर्थन भारतीय क्षेत्राची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या प्रति प्रतिबद्धता दाखवते. याशिवाय रशियासोबत सातत्याने चर्चा करत भारताकडून युद्धाची स्थिती सुधारण्यासाठी केला जाणारा प्रयत्न कूटनितीचे महत्व दाखवून देतो.

भारताचा दृष्टीकोन
भारताच्या कूटनिती रणनितीकडून जगाने शिकण्यासारखे आहे. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये राजकीय सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचे महत्व आणि जगातिक स्तरावर शांति निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न हे भारताच्या कूटनितीमधून दिसते. याशिवाय सातत्याने दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून केले जाणारे प्रयत्नही फार महत्वाचे ठरत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया-युक्रेन दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. दोन्ही देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केलेले स्वागत एकमेकांवरील विश्वास, सन्मान दाखवून देतो. याशिवाय भारत दोन्ही देशांमध्ये समतोल राखण्याचा दुवा असल्याचेही दिसून येत आहे.

अहिंसेच्या प्रति भारताची वचनबद्धता
भारताची परराष्ट्र धोरणाच्या केंद्रात अहिंसेप्रति त्याची प्रतिबद्धता आहे. ज्याचा अवलंब महात्मा गांधी यांनी केला होता. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत सातत्याने संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघर्षावर शांती आणि संवाद हा एकमेव सिद्धांत असल्याचे दाखवून दिले आहे.

आणखी वाचा : 

Russia-Ukraine मधील संघर्षाची स्थिती सुधारण्यासाठी PM मोदींचे प्रयत्न

अदानींनी अंबानींना मागे टाकले, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?