
रोहित पवारांचा MPSC आयोगावर दबावाचा आरोप
MPSC पेपरफुटीच्या संशयित प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तुकाराम मुंडे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे निवेदन MPSC आयोगाकडे पाठवण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. ऋषिकेश गांगर्डे यांनी तक्रार मागे घेतलेली नसल्याचा दावा करत, लोकेश उर्फ गौरव पाटील यांच्यावर दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला. पेपरफुटीच्या संशयाची निष्पक्ष चौकशी करून विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी तुकाराम मुंडे यांच्या FDA मधील कामाचेही त्यांनी कौतुक केले.